Tue, Mar 19, 2019 11:36होमपेज › Sangli › भारतीयममुळे ग्रामीण भागातील कला- गुणांना वाव

भारतीयममुळे ग्रामीण भागातील कला- गुणांना वाव

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:36PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील कला गुणांना वाव देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून  भारती विद्यापीठाच्या भारतीयम या सांस्कृतिक उपक्रमाने केले आहे,असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्‍वजित कदम यांनी केले. येथे भारती कला अकादमी व मातोश्री बयाबाई कन्या महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित भारतीयम या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम ,अभिनेते सुनील गोडबोले , हार्दिक जोशी ,नगराध्यक्षा आकांक्षा जाधव उपस्थित होत्या.

डॉ. कदम म्हणाले,ग्रामीण भागातील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.  नवीन कलाकारांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे.कठोर परिश्रम केल्याशिवाय काही मिळत नाही.
अभिनेते  गोडबोले म्हणाले,तरुणांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे.कोणत्याही  स्पर्धामध्ये पारितोषिक मिळवण्यासाठी काम न करता परीक्षकांनी पसंतीचे पारितोषिक दिले पाहिजे. कलावंताची मूळ  प्रेरणा नाटक आहे.त्यासाठी जास्तीत जास्त नाटकातून यश संपादित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

ते म्हणाले, ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणत स्पर्धा आयोजित केल्या जातात ते पाहून मी अचंबित झालो आहे. खेडेगावात आमदार डॉ.पतंगराव कदम यांनी एवढे मोठे व्यासपीठ उभे केले आहे. त्याचा फायदा उदयोन्मुख कलावंतांना घेतला पाहिजे. सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम ,भारती विद्यापीठाचे मानद संचालक हणमंतराव कदम ,जयसिंग कदम , उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांच्यासह मान्यवर  आणि कलाकार मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा.व्ही.वाय.कदम यांनी मानले.

अभिनेते जोशी म्हणाले, भारती विद्यापीठाच्या माध्यमातून हा अतिशय  स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.शिक्षण क्षेत्रात भारती विद्यापीठाने  उत्तुंग काम करीत आहे.त्याचबरोबर भारतीयमसारखे कार्यक्रम राबवून शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कार्यात सुद्धा उल्लेखनीय काम करीत आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील कलाकारांना  होणार आहे.