Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Sangli › डॉ. कदम यांचा अस्थिकलश उद्या सांगली, मिरजेत

डॉ. कदम यांचा अस्थिकलश उद्या सांगली, मिरजेत

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 8:53PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश शनिवारी  दर्शनासाठी सांगली, मिरजेत आणण्यात येणार आहे. सांगलीत तो सकाळी आठ  ते दुपारी एक या कालावधीत नागरिकांना दर्शनासाठी तो स्टेशन चौकात ठेवण्यात येणार आहे, असे महापौर हारुण शिकलगार यांनी सांगितले. तर मिरजेत दुपारी दोन ते सायंकाळी आठपर्यंत किसान चौक येथे  अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.   

शिकलगार म्हणाले, शून्यातून समाजकारण, राजकारण, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात विश्‍व निर्माण करणारे डॉ. कदम कर्मयोगी होते. त्यांचे महापालिका क्षेत्राच्या विकासातही मोठे योगदान आहे.  त्यांच्या अकाली जाण्याने राज्य आणि जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपरिमित पोकळी निर्माण झाली आहे. 

ते म्हणाले, डॉ. कदम यांची कर्मभूमी असलेल्या सांगलीत त्यांचा अस्थिकलश आणावा, अशी कार्यकर्त्यांसह नागरिकांची मागणी होती. त्यानुसार शनिवारी अस्थिकलश सांगलीत आणण्यात येणार आहे. 
शिकलगार म्हणाले, अस्थिकलश  स्टेशन चौकात सकाळी आठ ते दुपारी  एकपर्यंत ठेवण्यात येईल. तेथून अस्थिकलश मिरजेतील किसान चौक येथे दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत  दर्शनासाठी ठेवला जाईल. पुढे अन्य गावांना दर्शनासाठी पाठविला जाईल.