Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Sangli › कामे केली नाहीत तरी चालतील पण... : चंद्रकांत पाटील

कामे केली नाहीत तरी चालतील पण... : चंद्रकांत पाटील

Published On: Dec 06 2017 2:42PM | Last Updated: Dec 06 2017 2:42PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कामे केली नाही तरी चालतील पण भ्रष्टाचार करु नका असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या नूतन संरपंच व सदस्यांना दिला. ते सांगली जिल्ह्यातील नूतन सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये जिल्ह्यात भाजपचे १८६ सरपंच तर १५३३ सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्या सत्कार समारंभात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की एखाद्यावेळी कामे केली नाहीत तरी चालतलील पण एकही रुपयाचा भ्रष्टाचार करु नका. जिल्ह्याला चौदाव्या वित्त आयोगामार्फत ४०० कोटी रुपये मिळणार आहेत. तो निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जाईल. ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे रस्ते, गटारी, सभामंडप यांसारख्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल. तेव्हा विकासकामे नाही केलीत तरी चालेल पण एकाही रुपयाचा भ्रष्टाचार करु नका.’असा सल्ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन सदस्यांना दिला.

भाजप सरकारने विधानसभा, लोकसभा निवडणूकांत अभूतपूर्व यश मिळवले होते तेव्हा मोदींचा प्रभाव म्हणत विरोधकांनी टीका केली. त्यानंतरच्या महापालिका, नगरपालिकां निवडणूकांमध्ये भाजपने विजय मिळवला तेव्हा ही सूज असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. पण ग्रामपंचायतीमध्ये मिळालेल्या यशाने टीका करणाऱ्यांना उत्तर मिळाले असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.