मिरज : आदेश धाब्यावर बसवून डॉल्बीचा दणदणाट 

Published On: Sep 12 2019 11:00PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM
Responsive image


सांगली : प्रतिनिधी 

प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुक शांततंत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने डॉल्बीवर बंदी घातली होती. पण पोलिस प्रशासनाचे सर्व आदेश धाब्यावर बसवून मिरजेत डॉल्बीचा दणदणाट झालाच. 

पोलिस प्रशासनाने याआधी ज्या मडळांनी पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण आज सर्व आदेश धाब्यावर बसवून अपवाद वगळता सर्वच गणेश मंडळानी डॉल्बीच्या दणदणाट विसर्जन मिरवणूक काढली.  

पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेले डॉल्बी जप्त करण्यात आले होते. व  होते. परंतु गुरुवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत देखील ठरवून दिलेल्या डेसिबल पेक्षा जादा आवाजाने मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट करण्यात आला.