Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Sangli › सांगलीत डॉक्टर पत्नीची आत्महत्या

सांगलीत डॉक्टर पत्नीची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील फौजदार गल्लीत राहणार्‍या एका डॉक्टरच्या पत्नीने घरातील खिडकीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा राजकुमार पाटील (वय 26) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येबाबत माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांना जबाबदार धरले असून त्यांच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले. 

पूजा ही पती डॉ. राजकुमार अशोक पाटील यांच्यासमवेत फौजदार गल्लीत एका घरात भाड्याने रहात होती. तीन वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. तिचे पती एका खासगी रुग्णालयात सराव करीत आहेत.  पूजाचे रिसाला रस्त्यावर कॉस्मेटिक विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री पूजा आणि राजकुमार यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर राजकुमार बेडरूममध्ये जाऊन झोपला. तर पूजा हॉलमध्येच बसली होती. 

रात्री राजकुमारला जाग आल्यानंतर त्याने हॉलमध्ये येऊन पाहिले तेव्हा  पूजाने खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने तिचा फास सोडवून तिला सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, पूजाच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर माहेरच्यांनी उत्तरीय तपासणी थांबविण्याची मागणी केली. त्यामुळे शनिवारी रात्री माहेरची मंडळी आल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  माहेरच्या मंडळींची रात्री उशिरापर्यंत तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

सासरच्या मंडळींविरोधात तक्रार

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पूजाचे नातेवाईक मोठ्या संख्येने सिव्हिलमध्ये आले होते. त्यावेळी सासरच्या मंडळींमुळेच तिने आत्महत्या केल्याने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Tags : Sangli, sangli news, Doctor, wife, suicide,


  •