Tue, Apr 23, 2019 07:51होमपेज › Sangli › मेहनत केल्यास हमखास यश : प्रा. प्रदीप पाटील

मेहनत केल्यास हमखास यश : प्रा. प्रदीप पाटील

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 8:23PMइस्लामपूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी स्वत:तील ‘स्व’ ओळखावा व नियोजनबध्द परिश्रम, प्रामाणिक मेहनत केल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन चाटे कोचिंग क्‍लासेसचे शाखा संचालक प्रा. प्रदीप पाटील यांनी केले. 
इस्लामपूर येथे आयोजित दै. पुढारी व भास्कराचार्य प्रतिष्ठानच्यावतीने  तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. दै. पुढारीचे  प्रतिनिधी प्रा. अशोक शिंदे, शाखा संचालक प्रा. अभिजित शिंदे उपस्थित होते.दहावीत 97 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 13 विद्यार्थ्यांना भास्कराचार्य शिष्यवृत्ती रोख रक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 

प्रा. अभिजित शिंदे म्हणाले, चाटे कोचिंग क्‍लासेसने यशाचा आलेख वाढता ठेवला आहे.  प्रा. अशोक शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अध्ययनामध्ये सातत्य ठेवावे.  प्रा. जे. एस. शिर्के, प्रा. आर. एस्. बुकशेटे, गुणवंत विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संयोजन प्रा. व्ही.एस. पुदाले, रुपाली पाटील, धुमाळ, एन. एल. उपरे, गजानन पाटील, प्रा. विकास पाटील आदींनी केले. शाखा व्यवस्थापक प्रा. उमेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रमोद पाटील व प्रा. वर्षा माने यांनी सूत्रसंचालन केले.