Thu, Nov 15, 2018 15:50होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यातील रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा : डॉ. पतंगराव कदम 

कडेगाव तालुक्यातील रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा : डॉ. पतंगराव कदम 

Published On: Feb 10 2018 1:37AM | Last Updated: Feb 09 2018 10:24PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील विविध गावांतील जवळपास  200 किमीच्या ग्रामीण मार्गांना  प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिला आहे, अशी माहिती माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी  पत्रकारांना दिली.   

डॉ. कदम म्हणाले की, मी राज्यस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील विविध गावांतील जवळपास  200 किमीच्या ग्रामीण मार्ग व इतर मार्गांचा दर्जा उन्नत करून त्यांना  प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा दिला आहे. यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळण्याचा मार्ग आता  मोकळा झाला आहे. भविष्यात लवकरच या उर्वरित  रस्त्यांची दर्जेदार कामे होणार आहेत. यामुळे तालुक्यातील  ग्रामीण भागातील नागरिकांना पक्के डांबरीकरणाचे रस्ते मिळणार आहेत. मागील 20 वर्षांत कोट्यवधींच्या निधीतून तालुक्यातील अनेक  रस्त्यांची कामे झाली. 

काही  रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात करणे गरजेचे होते. या रस्त्यांची स्थिती सुधारावी, यासाठी  राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या ग्रामीण रस्त्यांना  जिल्हा मार्गाचा  दर्जा मिळाल्यामुळे निधी उपलब्ध होऊन रस्ते सुधारतील. यासाठी  केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कडेगाव  तालुक्यातील अनेक गावांमधील  जवळपास  200  किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिला आहे.  या निर्णयामुळे राज्यस्तरावरुन  व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थेट निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून रस्त्यांच्या स्थितीत आमूलाग्र बदल होणार असल्याचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.