Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Sangli › जत नगरपालिकेतील कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

जत नगरपालिकेतील कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:36PMजत : प्रतिनिधी

आमदार विलासराव जगताप यांनी केलेल्या तक्रारीनुसार जत नगरपालिकेच्या  कारभारांची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला. चौकशी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.आमदार जगताप, नगरसेवक विजय ताड,  प्रवीण माने,  उमेश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

नगरपालिकेत गेल्या सहा वर्षांत सत्ताधार्‍यांनी शौचालय योजना, स्वच्छता टेंडरमध्ये गैरव्यवहार केला आहे. त्याशिवाय लाईट साहित्य, झेरॉक्स मशीन, संगणक खरेदीत घोटाळा केला आहे. सभेचे चुकीचे प्रोसिडींग लिहिणे, माहिती अधिकार अर्जाची माहिती न देणे, कंत्राटी टेंडरमध्ये घोळ करणे, नगरसेवकांच्या विरोधात आंदोलने करणे, मासिक बैठकीत विरोधी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी ठराव करणे आदी बाबतीत जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्याधिकारी हेमंत निकम यांचा कार्यभार काढून घेतला आहे. तहसीलदार पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केले आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे लेखी आदेश जारी केले आहेत.