Sat, Aug 24, 2019 23:26होमपेज › Sangli › जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ ४७ कोटींनी घटणार

जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ ४७ कोटींनी घटणार

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:11PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी,  ‘ओटीएस’ लाभामुळे जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ सुमारे 47 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. विकास सोसायट्यांचा ‘एनपीए’ सुमारे 250 कोटींनी कमी होणार आहे. बहूसंख्य विकास सोसायट्यांना व्यस्त तफावतीतून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफी महत्वपूर्ण ठरणार आहे. संबंधित शेतकरी आणि जिल्हा बँक, विकास सोसायटीस्तरावर ‘फिलगुड’ वातावरण आहे. 

जिल्ह्यात 56 हजार शेतकर्‍यांची 380 कोटींची कर्जमाफी आणि 1 लाख 68 हजार शेतकर्‍यांना 421 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने कर्जमाफीसाठी निकष, अटी जाहीर केल्या. त्यामुळे बरेचसे शेतकरी अपात्र ठरले आहेत. कर्जमाफीच्या चार टप्प्यात 1 लाख 11 हजार 712 शेतकर्‍यांना सुमारे 281 कोटी रुपयांचा लाभ होत आहे. त्यातील 29 हजार शेतकर्‍यांची 105 कोटींची कर्जमाफी झाली आहे. ‘ओटीएस’साठी 7 हजार 258 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाखाचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीचे आणखीही एक, दोन टप्पे अपेक्षित आहेत. 

कर्जमाफी व ‘ओटीएस’ लाभामुळे विकास सोसायट्यांची कर्जवसुली मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे बहुसंख्य विकास सोसायट्या व्यस्त तफावतीतून बाहेर पडणार आहेत. जिल्हा बँकेचा ‘एनपीए’ही कमी होणार आहे. शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेलाही लाभदायक ठरली आहे.