Sun, Aug 25, 2019 19:50होमपेज › Sangli › जिल्हा बँकेला कर्ज रोख्यातून २.४७ कोटी नफा

जिल्हा बँकेला कर्ज रोख्यातून २.४७ कोटी नफा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 11:08PMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेला शासकीय कर्ज रोख्यातून 2.47 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यापुढे नफ्याचे माध्यम म्हणून रोख्यातील गुंतवणुकीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेत बुधवारी गुंतवणुक समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. संचालक विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, उदयसिंह देशमुख, डॉ. प्रताप पाटील, विक्रम सावंत तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील, बी. एम. रामदूर्ग, व्यवस्थापक सुधीर काटे, जे. जे. पाटील उपस्थित होते. 

केंद्र, राज्य शासनाचे कर्जरोखे व टेझरी बिलातील गुंतवणूक 213 कोटी 42 लाख रुपये होती. कर्ज रोख्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून जिल्हा बँकेला 2.47 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. 

पीक कर्जवाटपात तुलनेने बँकेला तोटा होतो. मात्र तरीही बँकेने सामाजिक बांधिलकी जपून पीक कर्जपुरवठा वाढविला आहे. कारखान्यांकडून जादा व्याज मिळत होते. मात्र व्याज दराच्या सवलतीच्या स्पर्धेमुळे उत्पन्नवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत व्यवसायवाढीला महत्त्व दिले आहे. गुंतवणुकीतून जादा उत्पन्न, नफा याकडे विशेष लक्ष दिले आहे.