होमपेज › Sangli › कर्जमाफीचे 20 कोटी रुपये आले

कर्जमाफीचे 20 कोटी रुपये आले

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सहाव्या ‘ग्रीनलिस्ट’मधील कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानास पात्र 19 हजार शेतकर्‍यांच्या 34.88 कोटी रुपयांपैकी  20 कोटी रुपये जिल्हा बँकेला गुरूवारी शासनाकडून प्राप्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत एक ते पाच ग्रीनलिस्टमधील 87 हजार 995 शेतकर्‍यांच्या खात्यावर 187.59 कोटी रुपये वर्ग झाले आहेत.  कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाच्या एकूण 6 ग्रीनलिस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. एकूण 1 लाख 33 हजार 447 शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाची रक्कम 298 कोटी आहे. जिल्हा बँकेला शासनाकडून 195 कोटी आले आहेत. त्यातून 87 हजार 995 शेतकर्‍यांच्या खात्यावर 187.59 कोटी रुपये वर्ग केले आहेत. 

दरम्यान सहाव्या ग्रीनलिस्टमध्ये कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसची 19 हजार 542 शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाची मंजूर रक्कम 34.88 कोटी रुपये आहे. ओटीएसमधील 234 शेतकर्‍यांनी दीड लाखावरील 1.47 कोटी रुपयांची थकबाकी भरल्यास 2.33 कोटी रुपये माफ होणार आहेत. सहाव्या यादीतील 34.88 कोटींपैकी 20 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. दोन दिवसात ही रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेतून देण्यात आली. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस पात्र शेतकर्‍यांच्या 6 ग्रीनलिस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. आता सातव्या यादीची प्रतिक्षा आहे.