Mon, Feb 18, 2019 05:41होमपेज › Sangli › जिल्हा बँकेतर्फे ‘शतदिन ठेव योजना’

जिल्हा बँकेतर्फे ‘शतदिन ठेव योजना’

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 17 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकेतर्फे शतदिन ठेव योजना सुरू केली आहे. सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, शेतकरी व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, सामान्य ग्राहक, शेतकरी, विविध संस्थांकडून ठेवीवर जादा व्याज दर देण्याची मागणी केली जात होती. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्वच छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून काम करते. त्यामुळे अशा सर्व सहकारी संस्था, शेतकरी, ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न बँक सातत्याने करतेे. 

ही योजना दि. 16 फेब्रुवारी ते 31 मार्च 2018 या कालावधीकरिता राहणार आहे. अन्य बँकांमध्ये 90 दिवसांच्या ठेवींसाठी 6 टक्के व्याजदर आहे. जिल्हा बँक 100 दिवसांच्या ठेवीसाठी 7.50 टक्के व्याज देणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेकडे 4 हजार 26 कोटींच्या ठेवी आहेत. दि. 31 मार्चअखेर ठेवींचे  5 हजार 300 कोटींचे उद्दिष्ट आहे.