Fri, Jul 19, 2019 13:32होमपेज › Sangli › जिल्हा बँक : तांत्रिक २५ पदांसाठी ४८६ अर्ज

जिल्हा बँक : तांत्रिक २५ पदांसाठी ४८६ अर्ज

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 05 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकेकडील तांत्रिक 25 पदांच्या भरतीसाठी 468 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर थेट मुलाखती होणार की लेखी परीक्षा व मुलाखती होणार याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, सातारा व औरंगाबाद जिल्हा बँकेकडील कर्मचारी भरतीसंदर्भातील तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्हा बँकेकडील भरती प्रक्रियेत सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. 

आयटी, सॉफ्टवेअर व हार्डवेअर, लॉ, अकौंटंट विभागाकडील अधिकारी, कर्मचार्‍यांची 25 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दुसर्‍यांदा जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले होते. पहिला जाहिरातीवेळी 340 उमेदवारांचे अर्ज आले होते. दुसर्‍या जाहिरातीनंतर नव्याने 128 उमेदवारांचे अर्ज आले. दोन दिवसात या अर्जांची छाननी होणार आहे.  

300 पदांसाठी नोकरभरती  महिनाभरात

दुसर्‍या टप्प्यात सांगली जिल्हा बँकेकडील लिपिक, शिपाई पदासाठी भरती होणार आहेत. कर्मचार्‍यांची 459 पदे रिक्त असून सुमारे 300 पदांवर भरतीचे संकेत मिळत आहेत. महिनाभरात या भरतीची प्रक्रिया सुरू होईल.