Tue, Apr 23, 2019 01:50होमपेज › Sangli › वारणा नदीपात्रात गढूळ पाणी

वारणा नदीपात्रात गढूळ पाणी

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 8:18PMऐतवडे खुर्द : वार्ताहर

चांदोली धरणातून बारमाही वाहणार्‍या वारणा नदीला सध्या  गढूळ पाणी आलेले आहे. बहुसंख्य गावांमध्ये पेयजल योजना रखडलेल्या आहेत. त्यामुळे  या नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गावोगावी होत असल्याने  ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. 

बारमाही वाहणार्‍या वारणा नदीतून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गढूळ पाणी वारणा नदीला आल्याने जुलाब, उलट्या यासारख्या साथीच्या रोगाचे थैमान सुरू झाले आहे. कुरळप आरोग्य केंद्राच्यावतीने विविध गावांमध्ये आरोग्याच्यादृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहे. सध्या ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना गढूळ पाण्याचा आरोग्याच्यादृष्टीने  मोठा त्रास सहन करावा लागतो. साथीच्या रोगाचे थैमान होण्यापूर्वी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.  दरम्यान, नदीकाठावरील रखडलेल्या योजना पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

पाणी उकळून प्या...

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पाणी उकळून तुरटीचा वापर करूनच घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत ऐतवडे खुर्द व आरोग्य विभागाने केले आहे.