Wed, Jul 24, 2019 12:32होमपेज › Sangli › कडेगावात धनगर समाजाचा मोर्चा 

कडेगावात धनगर समाजाचा मोर्चा 

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 9:57PMकडेगाव : वार्ताहर

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी  कडेगाव  तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो धनगर बांधव पिवळ्या झेंड्यांसह सहभागी झाले होते. मोर्चाच्यावेळी ढोल, कैताळाच्या आवाजाने सारा परिसर दणाणून गेला होता. 

यावेळी तहसीलदार अर्चना शेटे यांना कडेगाव तालुका सकल धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. बिरोबा मंदिरापासून सकाळी या मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गढळे म्हणाले, गेल्या 60 वर्षापासून धनगर समाज एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण मागत आहे. परंतु ‘धनगर’ व ‘धनगड’ या दोन्ही  वेगवेगळ्या जाती दाखवून सरकार समाजाची दिशाभल करीत आहे.  

सरपंच डॉ. विजय  होनमाने म्हणाले, कडेगाव तालुक्यामध्ये धनगड जातच अस्तित्वात नसताना तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये धनगड ही जात दाखविण्यात आली आहे. ते कोण आहेत व त्यांची  नावे, पत्ते लवकरात लवकर द्यावेत. तसेच आतापर्यंत कडेगाव तहसील कार्यालयातून किती धनगड जातीचे दाखले दिले गेले आहेत, याची माहितीही देण्यात यावी. 

यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र ठोंबरे, माजी सभापती शोभा होनमाने, लता रास्कर, रमेश एडके, प्रमोद गावडे, विजय रूपनर, शशिकांत रास्कर, अधिक पिंगळे, भानुदास काकडे, पृथ्वीराज होनमाने, राहुल रूपनर, अनिल गढळे, सचिन रूपनर, सागर रास्कर, विजय रास्कर  यांच्यासह कडेगाव तालुक्यातील धनगर समाजातील हजारो महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.