होमपेज › Sangli › जनतेची योजना केल्यामुळेच जलयुक्त शिवार यशस्वी : मुख्यंमत्री फडणवीस 

जनतेची योजना केल्यामुळेच जलयुक्त शिवार यशस्वी : मुख्यंमत्री फडणवीस 

Published On: May 18 2018 1:22PM | Last Updated: May 18 2018 1:22PMसांगली : पुृढारी ऑनलाईन

एखादी योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार जनतेची योजना केली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केले. ते जत तालुक्यातील बागलवाडी येथे बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तालुक्यातील आवंढी आणि  बागलवाडी येथील वॉटरकप स्पर्धेच्या कामामची पाहणी करण्यासाठी आले होते.

जलयुक्त शिवार योजनेला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत. बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणे आवश्यक आहेतच, पण त्याच बरोबर विकेंद्रित पद्धतीने पाणलोटाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६ हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार आणि वॉटरकपच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी जनसहभागाला दिले. दुष्काळाचे आव्हान स्वीकारून, दुष्काळाशी 2 हात केले व त्याला पराभूत केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन केले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी बागलवाडीत या स्पर्धेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगत याचे श्रेय गावात असलेल्या महिलाराजला दिले. तरुण आणि माता भगिनींनी प्रामाणिकपणे, सचोटीने वेळेच्या आत काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.