Thu, Nov 15, 2018 01:06होमपेज › Sangli › काँग्रेसकडे विकासकामे; विरोधकांकडे काय?

काँग्रेसकडे विकासकामे; विरोधकांकडे काय?

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 9:53PMसांगली : प्रतिनिधी

कायमच काँग्रेसमय असलेल्या सांगलीवाडीत काँग्रेसने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. विरोधक भाजपकडे जनतेला सांगण्यासाठी काय आहे? सामान्यांना महागाई आणि फसवणुकीशिवाय काय दिले, असा सवाल काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांनी केला. सांगलीवाडीत प्रभाग 13 चे उमेदवार नगरसेवक दिलीप पाटील, सौ. शुभांगी पवार व महाबळेश्‍वर चौगुले यांच्या प्रचाराचा राममंदीर येथे भव्य प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य प्रचारयात्रा काढण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव मोहिते, उद्योजक अशोक पवार, आनंदरावकाका पाटील, वसंतराव पाटील, धोंडिराम पाटील, महादेव आप्पा पाटील, शामरावअण्णा मगदूम, जी. के. दादा पवार आदी उपस्थित होते.जयश्री पाटील म्हणाल्या, काँग्रेसनेते स्व. मदनभाऊ पाटील व स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी दिलीप पाटील यांना संधी दिली. त्यातून त्यांच्यासह सहकार्‍यांनी सांगलीवाडीचा कायापालट केला. शुध्द व मुबलक पाणी देण्याची व्यवस्था केली. रस्ते चकाचक केले आहेत. ड्रेनेज व्यवस्थाही केली आहे. पुढे संधी द्या, सांगलीवाडीला शहरातील सर्वोत्तम पर्याय 
बनवू.

विजयआबा पाटील म्हणाले, आता काँग्रेससमोर आव्हान देणारे विरोधक भाजप, राष्ट्रवादी दोघेही 15 वर्षे एकत्र महापालिकेत सत्तेत होते. तेव्हा किती विकासकामे केली? आता आम्ही केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही जनतेसमोर आहे. त्याच जोरावर आम्ही पुन्हा निवडणुकीला समोर जात आहे. विरोधक काय सांगणार?यावेळी शंकराप्पा पाटील, माजी नगरसेवक सुखदेव मोहिते, नगरसेविका सौ. वंदना कदम, पांडुरंग भिसे, डी. वाय. पाटील, मधुकर पाटील, श्रीकांत मगदूम, शशिकांत पाटील, उदय पाटील, सच्चिदानंद कदम, दिलीप जाधव, शिवाजी यादव, रामभाऊ पाटील आदींसह ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.