Thu, Jan 17, 2019 23:01होमपेज › Sangli › डेप्युटी सीईओ रमेश जोशी यांची अखेर बदली

डेप्युटी सीईओ रमेश जोशी यांची अखेर बदली

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:28PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रमेश जोशी यांच्या बदलीचा शासन आदेश अखेर निघाला आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे व्याख्याते या पदावर त्यांची बदली झाली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) दीपाली पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. 

खातेप्रमुख व गटविकास अधिकार्‍यांनी जोशी यांच्या बदलीसाठी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदन दिले होते. जोशी हे खातेप्रमुख व काही बीडीओंची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याची तक्रार केली होती. या वादाची दखल पुणे विभागीय आयुक्तांनीही घेतली होती. याप्रकरणी आयुक्‍त कार्यालयात सुनावणी झाली होती. 

अध्यक्ष देशमुख यांनीही जोशी यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. स्थायी समिती सभेच्या प्रोसिडींगमध्ये अध्यक्षांच्या नावे काही वाक्ये घुसडल्याच्या प्रकाराने देशमुख नाराज होते. अखेर जोशी यांची बदली झाली आहे.  दि. 31 रोजी त्यासंदर्भात शासन आदेश जारी झाला आहे.