Sun, Aug 25, 2019 04:42होमपेज › Sangli › ठेवीदारांची 21 लाख रुपयांची फसवणूक

ठेवीदारांची 21 लाख रुपयांची फसवणूक

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:50PMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडिट सोसायटी (मुख्य कार्यालय हावरगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) ने  सतरा टक्के व्याज देतो, म्हणून ठेव घेतली.  वर्षभराने संस्थेने गाशा गुंडाळून पोबारा केला. या प्रकरणात चौघांची 21 लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार तासगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.याप्रकरणी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव शंकरराव आपेट, संचालक उमाकांत शंकरराव आपेट, कमलाबाई बाबासाहेब जकाते (सर्व रा. परळी वैजनाथ, जि. बीड), सांगली जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब धोंडी वाघमोडे (रा. मिरज) व लिपिक प्रताप कृष्णा साळुंखे (रा. बेंद्री, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंद्रजित रामचंद्र पाटील (रा. नागावकवठे, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.  पाटील यांच्यासह विठ्ठल गोविंद चव्हाण (रा. आरवडे), कमला भीमराव जाधव (रा. बस्तवडे), संजय गंगाधर कुंभार (रा. तासगाव) व नारायण धोंडीबा दाइंगडे (रा. पिंपरे बुद्रुक, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. पेड, ता. तासगाव) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इंद्रजित पाटील शेतकरी आहेत. ऑगस्ट 2016 मध्ये सोसायटीचा लिपिक साळुंखे याने पाटील यांना सोसायटीमध्ये बोलावून घेतले. व्यवस्थापक  वाघमोडे याच्याशी ओळख करून दिली. दोघांनी पाटील यांना ‘आमच्या शाखेत  ठेव पावत्या करा. 17 टक्के व्याज देतो’, असे सांगितले. पाटील यांना सर्व सोयी, फायदे यांचे आमिष दाखवून पावत्या करण्यास तयार केले. पाटील यांनी  दि. 26 सप्टेंबर 2016 रोजी आई गीतांजली रामचंद्र पाटील 

यांच्या नावाने तेरा महिन्याच्या मुदतीने  50 हजार रुपये ठेवीच्या पाच पावत्या केल्या.यानंतर वेळावेळी त्यांनी आई, वडील रामचंद्र तसेच स्वतःच्या नावाने अशा 13 लाख 27 हजार रुपयांच्या अनेक पावत्या केल्या. तेरा महिन्यांची मुदत संपल्यानंतर पाटील हे संस्थेत पैसे मागण्यासाठी गेले. व्यवस्थापक वाघमोडे व लिपीक साळुंखे यांनी सुरूवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर काही दिवसांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

काही दिवसांनी या दोघांनी संस्थेला कुलूप घालून आपला गाषा गुंडाळला. दरम्यान पाटील यांनी उस्मानाबाद येथील मुख्य शाखेत जाऊन चौकशी केली. मात्र तेथील आसपासच्या लोकांनी ही संस्था बंद पडली असल्याचे सांगितले.त्याचवेळी विठ्ठल चव्हाण यांची 5 लाख 40 हजार, कमला जाधव यांची 1 लाख, संजय कुंभार यांची 40 हजार तर नारायण दाइंगडे यांची 1 लाख अशी एकूण 21 लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.