होमपेज › Sangli › सांगलीत बँक कर्मचार्‍यांची निदर्शने

सांगलीत बँक कर्मचार्‍यांची निदर्शने

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

वेतन कराराची मुदत संपूनही नव्या वेतन करारासाठी टाळाटाळ करणार्‍या केंद्र शासनाचा बुधवारी राष्ट्रीयीकृत व शेड्युल्ड बँक कर्मचार्‍यांतर्फे निषेध करण्यात आला. बॅँक अधिकारी व कर्मचार्‍यांनी बुधवारी सकाळी शहरातील पटेल चौकातील बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील बँकांचे एका दिवसाचे 400 कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, या संपामुळे बँकांत शुकशुकाट होता तर ग्राहकांना गैरसोयीचा फटका बसला.  

युनायटेड फोरम ऑफ बॅँक्स युनियनतर्फे अधिकारी, कर्मचाजयांच्या प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी 30 व 31 रोजी संप पुकारण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी म्हणाले , नोटाबंदीच्या निर्णयावेळी प्रत्येक बँक कर्मचारी, अधिकार्‍याने मेहनत घेतली. त्याआधारेच वेतनवाढ अपेक्षित होती. मात्र तसे झाले नाही. नोटाबंदीच्या काळात काही बॅँकांची कर्जे वेळेवर वसूल होऊ शकली नाहीत. गुरुवारी सकाळी मिरजेतील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर निदर्शने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी उल्का तामगावकर, अरविंद चौगुले, संजय देशपांडे यांनी बँक कर्मचार्‍यांना विविध मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये परशुराम भोरे, उल्का तामगावकर, संजय समुद्रे, अजय गावडे, अनिल इनामदार, संजय देशपांडे, मोहन जोशी, शिवशंकर घाडगे, संजय नरदे, बाबासाहेब कोरोचे, महेश कुंभार, अनंत बिळगी आदींचा समावेश होता.