Fri, Feb 22, 2019 03:58होमपेज › Sangli › कर्नाटकात भाजपकडून लोकशाहीचा खून

कर्नाटकात भाजपकडून लोकशाहीचा खून

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:17PMसांगली : प्रतिनिधी

बहुमत नसतानाही कर्नाटकात  भाजपने सत्ता स्थापनेचा घाट घातला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा लोकशाहीचा खून आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. कर्नाटकातील राजकीय दडपशाहीच्या निषेधार्थ  येथे शुक्रवारी पक्षाच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर भाजपविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत भारतीय घटना संपवत आहे, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील.  जनता अशा प्रकारच्या घटनाबाह्य कृतीला साथ देणार नाही.

ते म्हणाले,  भाजपाची दपडशाही वृत्ती म्हणजे एक विकार बनत चालली आहे.  या देशाच्या लोकशाहीत अशा घटना घडणे म्हणजे राजकारण संपत्ती व सत्तेवर कसे चालते, त्याचे  उदाहरण म्हणावे लागेल. सत्तेचा दुरूपयोग ही लांच्छनास्पद बाब आहे.या आंदोलनात करीमभाई मेस्त्री, नामदेवराव मोहिते, राजेश नाईक, अजित ढोले, बिपीन कदम, पैगंबर शेख, बाहुबली कबाडगे, अमोल झांबरे, कय्युम पटवेगारसचिन चव्हाण, अशोक मासाळे, जॉर्ज पिंटो, महेश कर्णे, आनंद लेंगरे, अशोक माने, अजय माने, श्वेता शेठ, आदी उपस्थित होते.