Thu, Jul 18, 2019 17:24होमपेज › Sangli › मोटारसायकल घसरून अपघातात दोघांचा मृत्यू

मोटारसायकल घसरून अपघातात दोघांचा मृत्यू

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 12:25AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

पेठ-शिराळा रस्त्यावरील रेठरेधरणजवळ मंगळवारी पहाटे मोटारसायकल घसरून दोघे जण ठार झाले.  एक जण गंभीर जखमी झाला. सनी संजय काळे (रा. येलूर),  रवी राजू शेट्टी (रा. केरळ, सध्या रा. इस्लामपूर) अशी या ठार झालेल्यांची नावे आहेत. साईराज शेखर शेट्टी (रा. केरळ, सध्या रा. इस्लामपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. 

इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  तिघे जण मोटारसायकल (एमएच10/सीके 9023) वरून सोमवारी रात्री शिराळ्याला  गेले होते. ते पहाटे परत येत होते. रेठरेधरण तलावाजवळ उतारावरून भरधाव मोटारसायकल घसरली. तिघे जण मोटारसायकलबरोबर फरफटत गेले. 

सनी काळे, रवी शेट्टी यांचे  डोके रस्त्यावर  आपटल्याने ते जागीच ठार झाले. साईराज यांना इस्लामपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.