Thu, Nov 15, 2018 18:04



होमपेज › Sangli › विट्यात टेम्पोखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू

विट्यात टेम्पोखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 12:19AM

बुकमार्क करा





विटा : वार्ताहर 

विटा-पारे रस्त्यावर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडून सुरेखा रवींद्र जाधव (वय 35, रा. वसंतनगर, विटा)  यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत विटा पोलिसांत टेम्पोचालक कादर अब्बास शेख यांनी वर्दी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कादर शेख हा टेम्पो (एमएच10 झेड 377) घेऊन पारेहून विट्याकडे येत होता. विट्याजवळील वसंतनगर येथेे सुरेखा जाधव या स्कूटीवरून रस्त्यावर पडल्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरून टेम्पोचे पाठीमागील चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.  याबाबत विटा पोलिसांत नोंद झाली असून, टेम्पोचालक शेख हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.