Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Sangli › स्वाईन फ्लूने येळावीतील महिलेचा मृत्यू

स्वाईन फ्लूने येळावीतील महिलेचा मृत्यू

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:50PMतासगाव : प्रतिनिधी

तालुक्यात स्वाईन फ्लूची साथ  आहे. येळावी येथील चंदाराणी सुखदेव गडदे (वय 32) यांचा सोमवारी सांगलीतील खासगी दवाखान्यात स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांचा भाऊ तानाजी बिरू शेंडगे ( वय 35) यांच्यावरही सांगलीतील शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठीचे उपचार सुरू आहेत. वासुंबे येथील तानाजी सीताराम पाटील (वय 54) यांच्यावरही    उपचार सुरू आहेत.

स्वाईन फ्लूचे दोन आणि सदृश आजार झालेले असे तीन रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. साथ नियंत्रणात आणण्याचे आव्हान विभागासमोर आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले, की  येळावी चंदाराणी गडदे यांना  श्वसनाचा त्रास होत होता.  दि 6 सप्टेंबर  रोजी सांगली येथील  इस्पितळात तिला दाखल केले होते.  तपासणी करण्यात आली. ती स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह आली. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. 

 त्यांना  दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे भाऊ तानाजी शेंडगे यांनाही  श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ते सुध्दा स्वाईन फ्लू सदृष्य आजाराने त्रस्त आहेत. खासगी इस्पितळात उपचार सुरू असलेल्या वासुंबे येथील  तानाजी पाटील यांचीही   स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, असे  डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.