Tue, Jul 23, 2019 19:07होमपेज › Sangli › उपनिरीक्षकासह  दिवसपाळीच्या पोलिसांनाही चौकशीसाठी बोलावले 

उपनिरीक्षकासह  दिवसपाळीच्या पोलिसांनाही चौकशीसाठी बोलावले 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्याचा तत्कालीन कार्यभार असलेले पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांच्यासह त्या दिवशी दिवसपाळीला असलेल्या पोलिसांचीही सीआयडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. 

कोथळे खूनप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे, तर सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. अनिकेतचा मृत्यू झाला त्या दिवशी पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके  रजेवर असल्याने समीर चव्हाण यांच्याकडे कार्यभार होता. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. 

त्या दिवशी रात्रीपाळीला असलेल्या सात पोलिसांचे निलंबन करून चौकशी सुरू आहे. त्यांचे यापूर्वी जबाब झाले असले तरी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. अनिकेतच्या खुनाचा  प्रकार रात्री नऊपूर्वी घडला आहे. त्यामुळे दिवसपाळीला असलेल्या पोलिसांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील संशयितआरोपी कारागृहात गेल्याने इतर तपासाकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. भक्कम पुराव्यासह दोषारोपपत्र सादर करण्यासाठी कागदपत्रांची तयारी करण्यात येत आहे, असे सीआयडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.