Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Sangli › हरणांमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान

हरणांमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान

Published On: May 26 2018 12:34AM | Last Updated: May 26 2018 12:34AMदेवराष्ट्रे : वार्ताहर

सागरेश्‍वर वन्यजीव अभयारण्यातील मोकाट हरणे परिसरातील पिकांवर ताव मारत धुमाकूळ घालत आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकर्‍यांची भरपाईची प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत विचारले असता येथील वनाधिकार्‍यांकडून प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याचे उत्तर दिले जाते.हरणांमुळे पिकांचे लाखोंचे नुकसान होत असताना वनविभाग मात्र तूटपुंजी भरपाई देण्यात धन्यता मानतो. मात्र यासाठी देखील अनेक दिवस वाट पहावी लागते. जीवापाड जपलेली पिके रातोरात उद्ध्वस्त होताना पाहून  शेतकर्‍यांचा जीव तीळ-तीळ तुटतो आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच उद्योग असल्याची  प्रतिक्रिया आहे.

अभयारण्यात सुरुवातीस मोजकीच हरणे होती. ती देखील बंदिस्त होती. नंतर त्यांना मुक्त करण्यात आले.  अभयारण्याला जाळीचे कुंपण नाही.  चारा, पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ही मुक्त हरणे अभयारण्याबाहेर पडली आहेत.अभयारण्याबाहेर पडलेल्या  या हरणांच्या धुमाकुळामुळे लगतच्या शेतकर्‍यांचे लाखोंचे  नुकसान होत आहे. प्रामुख्याने नोव्हेंबर ते जून दरम्यान शेतीचे मोठे नुकसान होते. याच काळात हरणांना अभयारण्यात पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. अभयारण्यातील गवताला कुसळे आल्याने आणि ते वाळल्याने हरणे तो चारा खात नाहीत. बाहेर त्यांना पिकांचा हिरवा चारा आयता मिळतो  आहे.

भरपाईचे प्रस्ताव पाठवले

याबाबत कडेगाव प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन काळेल म्हणाले, तालुक्यातील शेतकर्‍यांचे पीक नुकसानीचे पंचनामे केले  आहेत. नुकसान भरपाईचे प्रस्ताव वनविभागाच्या सांगली येथील वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले आहेत.