Wed, Jan 23, 2019 20:12होमपेज › Sangli › दै. पुढारी ‘कस्तुरी’ क्‍लबतर्फे  सांगलीत शनिवारी केक वर्कशॉप

दै. पुढारी ‘कस्तुरी’ क्‍लबतर्फे  सांगलीत शनिवारी केक वर्कशॉप

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 8:49PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

यंदा ख्रिसमससाठी विविध पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करणार्‍या गृहिणींसाठी नवनवीन केक रेसिपी तसेच ‘बर्थडे’ केक रेसिपी शिकण्याची संधी दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दि. 23 डिसेंबर (शनिवार) रोजी दुपारी 2 वाजता  विक्रेता भवन, त्रिकोणी  बागेजवळ, सांगली येथे कस्तुरी क्‍लब आयोजित ‘ख्रिसमस व बर्थडे केक’ रेसिपी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. वर्कशॉपमध्ये शेफ पूजा शेट्टी या मार्गदर्शन करणार आहेत. या वर्कशॉपमध्ये विविध प्रकारचे केक तसेच होममेड चॉकलेटस् बनविण्याच्या रेसिपी  मायक्रो ओव्हन शिवाय घरच्या घरी गॅसवर कशा बनवायच्या ते वर्कशॉपमध्ये शिकवण्यात येणार आहे. 

यंदा ख्रिसमस पार्श्‍वभूमीवर कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासदांसाठी तसेच   नवीन सहभागी होऊ इच्छिणार्‍या महिलांसाठी वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. कस्तुरी सभासदांसाठी नोंदणी फी  50 रुपये आहे. तसेच इतर महिलांसाठी 200 रुपये आहे.  कस्तुरी क्‍लब  सभासद नोंदणी वर्कशॉपच्या ठिकाणीही सुरू राहील. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये असून सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. तसेच सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत.