Wed, Nov 21, 2018 04:11होमपेज › Sangli › झाडे तोडून ‘जगविण्याचा’ संदेश 

झाडे तोडून ‘जगविण्याचा’ संदेश 

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 7:26PMतासगाव :  प्रतिनिधी 

राज्यशासनाची 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्यासाठी तासगावच्या सामाजिक वनीकरण विभागाने चक्क झाडे तोडून झाडे जगविण्याचा संदेश देणारे डिजिटल फलक लावायला सुरुवात केली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या विभागाने तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील झाडांचीसुध्दा कत्तल केली आहे. 

यावर्षी 1 ते 31 जुलै कालावधीत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्याचे सरकारचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे वेळेत योग्य ते नियोजन करावे. विभाग प्रमुखांनी या कामास प्राधान्य देवून झालेल्या कामांचा दैनंदिन आढावा घ्यावा. सर्व कामांची माहिती द्यावी. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विविध कंपन्या, संस्थांच्या आवारात रोपे लावण्यासाठी उद्योजकांचीही मदत घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.