Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Sangli › वारणा नदीपात्रात मगरींचा वाढता वावर

वारणा नदीपात्रात मगरींचा वाढता वावर

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 7:39PMमांगले : वार्ताहर  

वारणा नदीच्या  कांदे - मांगले दरम्यानच्या पात्रात मगरींचा वावर वाढला आहे. वारणा नदीपात्रालगत वाळूत मगरी विसावलेल्या अवस्थेत शेतकर्‍यांच्या दृष्टीस पडत आहेत.मगरींकडून होणार्‍या हल्ल्याच्या घटनाही अनेकदा  घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात   भीतीचे सावट आहे. मांगले, कांदे , सागाव दरम्यानच्या  वारणा नदीपात्रात मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा परिसर जणू मगरींचे आश्रयस्थानच बनला आहे. नदीपात्र सतत पाण्याने तुडुंब भरलेले असते. त्यामुळे हा परिसर मगरींचे  आश्रयस्थान बनण्यास अनुकूल स्थिती असल्याने मगरींची संख्या वाढली आहे,यापूर्वी मांगले, कांदे, सागाव दरम्यान वारणा नदीपात्रालगत शेतकरी, मासेमारी करणारे व्यवसायिक  मेंढपाळ, शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यांवरही हल्ले केले आहेत. मासेमारी करण्याचे 

मच्छिमारांनी लावलेले जाळे मगरी कुरतडून टाकतात, जीवघेणे हल्ले करतात. मगरींची धास्ती असल्याने शेतकरी नदीपात्रालगत जाताना घाबरू लागला आहे. मगर कधी हल्ला करेल, याचा भरोसा नाही.दरम्यान,  वारणा मोरणा संगम असलेल्या मांगले गावालगत मोरणा नदीपात्रातून महाकाय मगरी येतात, शेतातील विद्युत मोटारी चालू बंद करावयास शेतकर्‍यांना नदीवर जावे लागते, नदीकाठावरील शेतात गेल्यानंतर सतत मगरी दृष्टीस पडत असतात.