होमपेज › Sangli › कृष्णा नदी काठावर आढळली मगरीची पिल्ले

कृष्णा नदी काठावर आढळली मगरीची पिल्ले

Published On: Jan 23 2018 10:05AM | Last Updated: Jan 23 2018 10:05AMसांगली : प्रतिनिधी
पद्माळे (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या काठावर काही मगरींची पिल्ली सापडली आहेत.लहान-लहान अठरा ते वीस पिल्ले सापडली आहेत. नदीच्या काठावरच पिल्ली सापडल्याने नदीकाठावर कायमस्वरूपी मगरीचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कृष्णा नदीच्या काठावर गावातील शेतकरी शेतीच्या कामासाठी जातात. या अगोदरही अनेकवेळा या काठावर अनेक मगरींचे दर्शन झाले आहे. दरम्यान,  आज या काठावर अठरा ते वीस मगरींची पिल्ले सापडली आहेत. यामुळे पुन्हा शेतकर्‍यांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मगरींची पिल्ले काही लोक पळवून नेत असल्याची शंका काही शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी अनेकदा मगरींची पिल्ली दिसतात, परंतु दुसर्‍या दिवशी ती कोठेही ही पिल्ले आढळून येत नाहीत.