Thu, Apr 25, 2019 15:49होमपेज › Sangli › ब्रम्हनाळमध्ये मगरीने मुलाला ओढून नेले

ब्रम्हनाळमध्ये मगरीने मुलाला ओढून नेले

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 21 2018 12:14AMभिलवडी : वार्ताहर 

पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीत सागर सिधू डंक (वय 15, रा. हारुगिरी, ता. रायबाग) या मुलाला मगरीने ओढून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांकडून शोधमोहीम सुरू होती.

कर्नाटकातील हारुगिरी येथील सागर डंक हा त्याचे मामा सुनील मारुती नरुटे यांच्याकडे सुटीसाठी आला होता. नववीत शिकणारा सागर मामांसोबत कृष्णा नदीकाठी गेला होता. इतर मुलांसोबत नदीकाठी घाटावर तो बसला होता. त्यावेळी मगरीने सागरवर हल्‍ला करून त्याला पात्रात ओढून नेले. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. मामासमोरच भाच्याला मगरीने ओढून नेले. क्षणार्धात मगर सागरला घेऊन नदीपात्रात गायब झाली. शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा म्हणाले, ग्रामस्थांनी वन खात्यातील कर्मचार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन  नॉट रिचेबल होता. मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. 

Tags : sangli,  Bramhnala, Crocodile pulled, child, sangli news,