Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Sangli › अंकलखोपमध्ये म्हसोबा मंदिराजवळ मगरीचा वावर

अंकलखोपमध्ये म्हसोबा मंदिराजवळ मगरीचा वावर

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 10:39PMभिलवडी : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिराजवळ अजस्त्र मगरीचा वावर असल्याचे दिसून आले आहे. म्हसोबा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यालगत गवताच्या  पोटमळ्या आहेत. नदीकाठी असलेल्या या मळ्यांमध्ये शेतीपंप बसवण्यात आले आहेत. शेतकर्‍यांची या भागात सतत ये-जा असते. भिलवडी -अंकलखोप रस्त्यावरुन म्हसोबा मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर पादचार्‍यांचीही मोठी वर्दळ असते. पण या मार्गालगत असलेल्या गवताळ भागात  मगरीचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मगरीने  कळपावर हल्‍ला करुन बोकड फस्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेतकर्‍यांनाही धोका निर्माण झाला आहे. मगर सतत दिसू लागल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.