Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Sangli › कृष्णेत मगरींचा मुक्‍तसंचार

कृष्णेत मगरींचा मुक्‍तसंचार

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 11:17PMसांगली : प्रतिनिधी

सांगली व हरिपूर येथील कृष्णातीरावर मगरींचा मुक्‍त संचार वाढल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरिपूर येथील बागेच्या गणपतीजवळील कृष्णानदीच्या तिरावर, सांगलीवाडीकडील बाजूस अनेक मगरींचा मुक्‍त संचार होत असल्याचे नागरिकांना आढळून आल्यामुळे या ठिकाणी जाण्याचे धाडस कोणीही करीत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या मगरी दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी व जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

या मगरी मोठ्या असल्याने परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरित त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.