Sun, Jul 21, 2019 05:58होमपेज › Sangli › सांगलीमध्ये कृष्णा नदीत मगरीचा वावर 

सांगलीमध्ये कृष्णा नदीत मगरीचा वावर 

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:33AMसांगली : प्रतिनिधी 

सांगलीत कृष्णा नदीत गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी मगरीचा मुक्‍तपणे वावर दिसून आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या घटनेची दिवसभर चर्चा शहरात सुरू होती. मगरींच्या या वावराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

सांगलीत कृष्णा नदीपात्रात नवीन पुलापासून ते हरिपूरपर्यंत मगरींचा वावर आहे. काही मगरी सतत किनार्‍यावर निवांत पहुडलेल्या आढळून येत आहेत. अनेक वेळा माईघाट परिसरात मगरी मुक्‍तपणे संचार करीत असल्याचे आढळून येते. काही जण हल्ल्यात जखमीही झाले आहेत. यामुळे पोहणार्‍यांची संख्या घटली आहे. 

आजही पुन्हा मगरीचे दर्शन झाले. आयर्विन पुलाच्या जवळपास दहा ते बारा फूटांवर मगर नदीपात्रात संचार करताना दिसून आली.  मगर दिसताच अनेकांनी आरडाओरडा करून घाटावरील लोकांना सावध केले. काहींनी या मगरीचे चित्रिकरण करुन ते  सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे दिवसभर सांगलीत या घटनेची चर्चा सुरु होती. मगरी पकडून चांदोली धरणात सोडून देण्याची मागणी होत आहे. पण वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.