Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Sangli › गुन्हेगारांना उमेदवारी नाही; नव्या चेहर्‍यांना प्राधान्य 

गुन्हेगारांना उमेदवारी नाही; नव्या चेहर्‍यांना प्राधान्य 

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:13AMसांगली : प्रतिनिधी

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे निवडणूक कार्यालय सांगली मार्केट यार्डजवळ ‘विजय’ बंगल्याशेजारील ‘राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे सुरू करण्यात येत आहे. महापालिकेसाठी इच्छुकांचे अर्ज गुरूवारपासून (दि. 17) स्विकारले जाणार आहेत. नव्या सुशिक्षित अराजकीय चेहर्‍यांनाही संधी दिली जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, मागासवर्गीय सेलचे उत्तम कांबळे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विनया पाठक, मैनुद्दीन बागवान, सागर घोडके, अभिजीत हारगे, मनोज भिसे उपस्थित होते.बजाज म्हणाले,  महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. 17 पासून अर्ज मागविले जात आहेत. सांगलीत राजारामबापू ‘इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आरआयटी) या कार्यालयात हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे पक्षाचे संपर्क कार्यालय हे पक्षाच्या जिल्हा कार्यालयाऐवजी ‘आरआयटी’ हे असणार आहे. 

समाजकंटक, खंडणीखोरांना थारा नाही

महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांना थारा दिला जाणार नाही. समाजकंटक, खंडणीखोर व अन्य गंभीर गुन्ह्यात सहभाग निदर्शनास आलेल्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षाच्या विद्यमान उमेदवारांबरोबरच नव्या चेहर्‍यांनाही संधी दिली जाणार आहे. सुशिक्षित तरूण, डॉक्टर, इंजिनिअर, वकील व अन्य अराजकीय क्षेत्रातून पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी होत आहे. त्यांचाही प्राधान्याने विचार केला जाणार आहे, असे बजाज, पाटील, प्रा. जगदाळे यांनी सांगितले.