Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Sangli › तासगावमध्ये विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

तासगावमध्ये विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

येथील लुगडे मळा येथे राहणार्‍या विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बंडू कदम   - लुगडे (रा. चिंचणी रोड, लुगडे मळा, तासगाव) असे त्याचे नाव आहे. स्वप्नाली सचिन कदम-लुगडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. 

गेल्या 9 वर्षांपासून सचिन हा माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी वारंवार मारहाण, जाचहाट करीत असल्याने मुलीने आत्महत्या केली असल्याची फिर्याद वडील जयसिंग परशुराम चव्हाण (वय 52, रा. मोरगाव, ता.  कवठेमहांकाळ) यांनी दिली.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सचिन व स्वप्नाली यांचा विवाह 2006 मध्ये झाला. यानंतर दोन वर्षे सुखात गेली. मात्र 2008 पासून सचिन याने तासगाव - भिवघाट रस्त्याच्या बाजूला असणार्‍या जमिनीचे सपाटीकरण करायचे आहे, यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी स्वप्नाली यांना मारहाण करू लागला. 

दरम्यान, स्वप्नाली या नकार देत असल्याने त्याने सातत्याने मानसिक, शारीरिक छळ सुरू केला. अखेर शुक्रवारी स्वप्नाली यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे करीत आहेत.