Mon, Nov 19, 2018 00:45होमपेज › Sangli › सांगली : अखेर फरारी गुंड भावशा पाटील अटकेत

सांगली : अखेर फरारी गुंड भावशा पाटील अटकेत

Published On: May 11 2018 1:50PM | Last Updated: May 11 2018 1:50PMइस्लामपूर : प्रतिनिधी

गेल्या आठ वर्षांपासून फरार असलेल्या रेठरे धरण येथील गुंड भावशा पाटील याला अखेर अटक करण्यात आली. आज सकाळी पंढरपुरात गुंडा पथकाने ही कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तीन खून, खुनाचे प्रयत्न, चोऱ्या असे गुन्हे भावशा पाटील याच्यावर नोंद आहेत. गेल्या ८ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली होती. आक्टोंबर २०१० मध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देवून इस्लामपूर न्यायालयातून पळाला होता. अखेर त्याला पकडण्यात पोलीसांना यश आले. 

गुंड भावशा पाटी याच्यावर विटा येथील गुंड संजय कांबळे. रेठरे धरण येधील धनाजी पाटील, संताजी खाडागळे यांच्या खुनाचे गुन्हे नोंद आहेत.

Tags :Crime, Criminal, Bhavasha Patil, Arrested, Police