Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Sangli › बांगलादेशच्या महिलेवर गुन्हा

बांगलादेशच्या महिलेवर गुन्हा

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील गोकुळनगर येथे गुरुवारी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेवर बेकायदा, विनापरवाना वास्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली असून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

ब्युटी बेल्लाल हुसेन अख्तर (वय 19, रा. रामचर, जि. बोरीशाल, बांगलादेश) असे त्या महिलेचे नाव आहे. गोकुळनगर येथे अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास भाग पाडले जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला होता. त्यावेळी बांगलादेश आणि कर्नाटकातील चार युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. रात्री उशिरा तीन मुलींच्या वयाचे दाखल प्राप्त झाले. मात्र ब्युटीचा दाखला मिळाला नाही शिवाय तिच्याकडे व्हिसाही नसल्याचे आढळून आले. 

त्यानंतर तिच्यासह मालन पुजारी या महिला एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी ब्युटीवर वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य केले. सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरी केली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिला अटक करण्यात आली असून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.