Tue, Jun 25, 2019 13:15होमपेज › Sangli › नेर्ले परिसरात वाढता ‘क्राईम रेट’

नेर्ले परिसरात वाढता ‘क्राईम रेट’

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 8:40PMनेर्ले : राजेंद्र पाटील

नेर्ले, पेठ, काळमवाडी परिसरात छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे क्राईम रेट वाढला आहे.  तरूणांची हुल्लडबाजी आणि महामार्गावरील रात्रीच्यावेळी होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांचा वचक कमी झाल्याचे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

कासेगाव, वाटेगाव, नेेर्ले, पेठ आदी गावे सधन  म्हणून ओळखली जातात. बागायत शेती आणि महामार्गालगत असणार्‍या या गावामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या भागात अनेक मध्यस्थींची साखळी कार्यरत झाली आहे. कासेगाव, वाटेगाव महाविद्यालयात परिसरातील तरूणांची दैनंदिन ये-जा सुरू असते. तरूणांच्या वाढत्या हुल्लडबाजीने अनेकवेळा किरकोळ वादातून मोठमोठ्या हाणामार्‍या होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महामार्गाच्या पश्‍चिम भागातील गावात किरकोळ मारामारी, अनेक ठिकाणी पती-पत्नींचा वाद तसेच हद्दीवरून हाणामारी अशा घटना वारंवार घडत आहेत.

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत.काही दिवसांपूर्वी एका गावात तर पती-पत्नीचा वाद अगदी शिगेला पोहोचला.  बाहेर गावाहून आलेल्या 15-20 तरूणांना त्या गावातील युवकांनी घेरले. यावेळी मोठा अनर्थ घडण्याआधी  पोलिसांनी या तरूणांची सुटका केली. असे अनेक प्रकार वारंवार घडू लागले आहेत.पोलिसांनी तरूणांचा व अशा गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Tags : sangli, sangli news, Crime Rate, increases, Nerle area,