Sat, Jan 19, 2019 20:51होमपेज › Sangli › येळवी, निगडी परिसरात सारस पक्षी दाखल

येळवी, निगडी परिसरात सारस पक्षी दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येळवी : विजय रुपनूर 

रब्बी हंगामातील करडई या तेलबियांचे पीक तयार होत आले, की या परिसरात सारस पक्ष्यांचे आगमन होते. तसे ते सध्या झाले आहे. बगळ्याच्या जातीतील या पक्ष्यांना प्राचीन भारतीय साहित्यात सारस किंवा क्रौंच असेही म्हटले आहे. ग्रामीण भागात त्याला कांडेकरकोचे असे म्हणतात. या पक्ष्यांचे थवेच्या थवे सध्या येळवी परिसरात दाखल होत आहेत. 

जत आणि लगतच्या मंगळवेढा तालुक्यात करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.  येळवी परिसरात गेल्या काही वर्षांत हे पीक कमी झाले आहे. मात्र जवळच्या निगडी येथील डोण वळसंग, डोण मंगळवेढा या भागात शेकडो हेक्टर करडईचे क्षेत्र आहे. तिथे हे पक्षी मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. 

या पक्ष्यांची चोच लांब असते. उंची सुमारे दोन ते अडीच फूट आहे. रंग फिकट पांढरा असून काही पक्ष्यांच्या पाठीच्या पंखांवर काळे पट्टेही आहेत. ‘कूर... कूर... कच’ असा आवाज ते सातत्याने काढत असतात. कदाचित त्यामुळेच बोली भाषेत त्यांना कांडेकरकोचे असे म्हणत असावेत. मुंगी, किडे, करडईचे बी असे त्यांचे खाद्य आहे. ते नेहमी सावध असतात.  थोडा जरी  आवाज आला  ते आकाशात झेप घेतात. ते समूहानेच फिरतात.  

सातासमुद्रापार प्रवास...

सारस किंवा क्रौंच म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पक्ष्यांपैकी काही जाती भारतातही आढळतात. मात्र बहुसंख्य जाती या सैबेरिया, मध्य युरोप, दक्षिण पूर्व आशिया येथे आढळतात.  ग्रीष्म, वसंत ऋतूत हे पक्षी सातासमुद्रापार किमान दोन ते अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून  येतात, असे पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी सांगितले. मात्र जत तालुक्यात जे पक्षी आले आहेत ते डोमेनियल क्रेन असावेत.

 

Tags : sangli, sangli news, Crane birds,  Yelvi Nigdi,


  •