Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Sangli › प्रभाग 8 मध्ये भ्रष्टाचार्‍यांना आता थारा नाही

प्रभाग 8 मध्ये भ्रष्टाचार्‍यांना आता थारा नाही

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:04PMसांगली : प्रतिनिधी

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस - राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून विकासाच्या गप्पा मारण्याचे काम सुरू आहे. नेहमी एकमेकांबरोबर भांडणारे आता  सत्तेसाठी एकत्र आले आहेत.   कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांना आता जनताच थारा देणार नाही, असा टोला भाजपचे प्रभाग आठमधील उमेदवार राजेंद्र कुंभार यांनी लगावला आहे. ते म्हणाले, भाजपच्या झंझावातामुळेच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्परविरोधी विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत.

दरम्यान,  प्रभागात रविवारी भाजपच्या प्रचार रॅलीचा जोरदार झंझावात होता. आनंदनगर, उत्कर्षनगर, विवेकानंद हौसिंग सोसायटी, शारदा हौसिंग सोसायटी आदी परिसरात ही फेरी काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र कुंभार, विशाल मोरे, कल्पना कोळेकर,  सोनाली सागरे आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मतदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राजेंद्र कुंभार म्हणाले, गेल्या वेळी काँग्रेस सत्तेत होती. राष्ट्रवादी केवळ नावालाच विरोधात असली तरी संगनमताने अनेक बोगस आणि निकृष्ट कामे त्यांनी केली. त्यामुळे  परिसराचा अपेक्षित विकास झाला नाही. कोट्यवधींचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी  चांगले रस्ते, गटारी नाहीत. एकही चांगले उद्यान नाही. मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही.

भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. त्याप्रमाणे आता महापालिकेतही सत्ता येणार आहे. त्यामुळे महापालिकेला निधी मिळण्यास अडचण येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील विकासाला चालना मिळणार आहे. प्रभागात तरुणांच्यासाठी सुसज्ज जीम, लहान मुलांच्यासाठी  उद्यान,  ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र, बंदिस्त भाजी मंडई, साहित्यप्रेमींसाठी सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक सुविधांनीयुक्‍त दवाखाना आदी उपक्रम  राबवण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळे मतदार आमच्या पॅनेलमधील  चारही उमेदवारांना मतदान करून या निवडणुकीत कमळ फुलवतील, यामध्ये  शंका नाही.