Sun, Sep 23, 2018 12:09



होमपेज › Sangli › शासनाच्या सर्वच खात्यात प्रचंड भ्रष्टाचार

शासनाच्या सर्वच खात्यात प्रचंड भ्रष्टाचार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





कडेगाव : शहर प्रतिनिधी

राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पोलिस खात्याचे लोकच नागरिकांचा खून करू लागले आहेत. शासनाच्या सर्वच खात्यात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळला असून राज्यात अराजकतेची परिस्थितीत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कडेगाव-पलूस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण लाड यांनी केले.

कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यासाठी शेतकर्‍यांचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत
होते.यावेळी बोलताना अरुण लाड म्हणाले, राज्यात महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती मालाच्या किंमती 
गडगडल्या आहेत. नोटाबंदीमुळे अनेक लहान मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्याचे निवेदन कडेगाव तहसीलदार अर्चना शेटे यांना देण्यात आले. यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, प्रमोद महिंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव पवार, वैशाली मोहिते, रामचंद्र थोरात, दत्ताजीराव मोहिते, नारायण पाटील, भीमराव महिंद, अंकुश
यादव, जयराम कुंभार, सतीश माळी, सिकंदर मुल्ला, अभिजित वांगीकर, अमोल पाटील आदी उपस्थित होते.