Wed, Jan 23, 2019 19:51होमपेज › Sangli › डीएनए अहवालाबाबत उलटसुलट चर्चा!

डीएनए अहवालाबाबत उलटसुलट चर्चा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे याच्या ‘डीएनए’ अहवालाबाबत लोकांमध्ये सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा अहवाल सांगलीत आला असून त्यातील निष्कर्षांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अहवाल अद्याप आला नसून तो चार दिवसात येणार असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दिली. 

अनिकेत कोथळेचा सांगली शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर संशयित पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो मृतदेह आंबोलीच्या जंगलात जाळून टाळल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी सांगलीत आणला.

मात्र आंबोली येथे मिळालेला  मृतदेह अनिकेतचाच आहे का हे तपासण्यासाठी मृतदेहाचे काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय अनिकेतच्या नातेवाईकांच्या रक्‍ताचे नमुनेही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल या गुन्ह्यातील प्रमुख पुरावा आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिकेतच्या नातेवाईकांना मृतदेह अद्याप ताब्यात देण्यात आलेला नाही.  तो मिरज येथील सिव्हील रुग्णालयात आहे.  

दरम्यान, या अहवालाबाबत लोकांच्यात मात्र उलटसुलट चर्चा आहे. सीआयडी अधिकार्‍यांनी मात्र अहवाल अद्याप आलेला नाही.आमचेही लक्ष या अहवालाकडे आहे.  चार दिवसात आम्हाला अहवाल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.