Mon, Jun 24, 2019 20:55होमपेज › Sangli › जातीयवाद रोखण्यासाठी समविचारी  पक्षांनी एकत्र यावे : डॉ. विश्‍वजित कदम

जातीयवाद रोखण्यासाठी समविचारी  पक्षांनी एकत्र यावे : डॉ. विश्‍वजित कदम

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:53PMकुंडल  : वार्ताहर 

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तरच येणार्‍या निवडणुकांमध्ये आपण अपेक्षित  यश मिळवू शकतो, असे मत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त  केले.  

येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड  साखर कारखाना कार्यस्थळावर  डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या समाधीस  त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते.आमदार कदम म्हणाले,  चुका उगाळत बसण्यापेक्षा आपला ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. आपणही   पुढे यावे. डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकारणाची सुरुवात जी. डी. बापूंच्या आशीर्वादाने  झाली होती. जी. डी. बापूंबद्दल पतंगराव कदम यांना  नेहमी आदर वाटत असे. उपसभापती अरुण पवार, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार उपस्थित होते.