Wed, Aug 21, 2019 03:13होमपेज › Sangli › पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 10:18PMसांगली : प्रतिनिधी

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सांगलीत सायकल रॅली काढली. पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचा भडका उडवून सरकारने महागाईचा आगडोंब उसळविला आहे, असा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून ही कृत्रिम महागाई कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

काँग्रेस कमिटीसमोरून आंदोलनाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या बळीराजाला आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड, मारुती रोड, हरभट रोड, गणपती पेठ मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून सायकल रॅली काढण्यात आली.

नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, युवकचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, डॉ. राजेंद्र मेथे, कय्यूम पटवेगार, रवी खराडे, बिपीन कदम, रफीक मुजावर, बाहुबली कबाडगे, विजय भोसले, मौला वंटमुरे, अर्जुन कांबळे, आशिष चौधरी, आयुब निशाणदार सहभागी झाले होते.