Wed, Jul 17, 2019 20:41होमपेज › Sangli › काँग्रेस विकासावर; भाजप, राष्ट्रवादी भूलथापांवर

काँग्रेस विकासावर; भाजप, राष्ट्रवादी भूलथापांवर

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:09PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस ही विकासकामांवर, जनतेच्या विश्‍वासावर महापालिका निवडणुक लढवित आहे. मात्र, भाजप भूलथापांवर, खोट्या आश्‍वासनांवर पुन्हा समोर आला आहे, असा टोला सांगलीवाडीतील प्रभाग 13 च्या उमेदवार सौ. शुभांगी पवार यांनी लगावला. केंद्र, राज्यातील सत्तेसाठी दिलेल्या आश्‍वासनांमुळे फसवणूक झालेली जनता आता यांना थारा देणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

त्यांनी हारुगडे प्लॉट, मोहिते गल्ली, मातंग समाज वस्ती आदी परिसरात व्यक्‍तीगत भेटीगाठी घेत प्रचार केला. माझ्यासमवेत काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील, महाबळेश्‍वर चौगुले यांच्या माध्यमातून पुन्हा सांगलीवाडीच्या विकासाची संधी द्यावी, असे  त्यांनी आवाहन केले.सौ. पवार म्हणाल्या, अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजप सरकारने केंद्र आणि राज्यातील पाच वर्षांच्या कारभारात जनतेचा भ्रमनिरास केला आहे. गॅस सिलिंडर महाग केले. पेट्रोल, डिझेल दर वाढवून महागाईचा आगडोंब उसळविला आहे. बलाढ्य कर्जबुडवे सरकारच्या कृपेने पळून जात आहेत. मात्र, कर्जबाजारी शेतकर्‍यांना गळफास घेण्याची नामुष्की आली आहे. हेच का अच्छे दिन?

त्या म्हणाल्या, सांगली आणि सांगलीवाडीसाठी या भाजपने पाच वर्षांत काय केले? शिवाय राष्ट्रवादी कोठे होती? उलट काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांमुळे सांगलीवाडीचा कायापालट झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जनाधार काँग्रेसच्याच पाठीशी आहे. येत्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच पाठबळ देऊन विरोधकांचे पानिपत करेल. यावेळी महिलांनी जागोजागी सौ. पवार यांच्यासह कार्यकर्त्यांचे स्वागत केले.