Tue, May 21, 2019 00:57होमपेज › Sangli › काँग्रेसचे उद्या मिरजेत निवडणूक रणशिंग

काँग्रेसचे उद्या मिरजेत निवडणूक रणशिंग

Published On: May 01 2018 1:27AM | Last Updated: May 01 2018 1:26AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 2) मिरजेतील किसान चौकात प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता वचनपूर्ती सभा होणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

ते म्हणाले, सभेत हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील तोफ डागणार आहेत. या सभेद्वारे काँग्रेसच्या वचनपूर्तीचीचा गौरव आणि भाजपच्या केंद्र, राज्यातील भ्रष्ट कारभाराचा पंचनामा होणार आहे. 

ते म्हणाले, जुलै महिन्यात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या सत्तेतून दिलेल्या वचननाम्याची पूर्ती करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सक्षमीकरण, ड्रेनेज योजना, 24 कोटींचे रस्ते तसेच शहरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यामुळे आता काँग्रेसच्या विकासावर जनतेने विश्‍वास ठेवला आहे. त्यादृष्टीने सर्वच पदाधिकारी, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, इच्छुक आता कामाला लागले आहेत.

पाटील म्हणाले, सर्वच नेत्यांनी एकदिलाने महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकण्याचा चंग बांधला आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, नेत्या जयश्री पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, महापौर , गटनेत्यंसह सर्व पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आज बैठकही पार पडली. बैठकीला पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, प्रा. सिद्धार्थ जाधव  यांच्यासह पदाधिकारी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.