Mon, May 27, 2019 09:13होमपेज › Sangli › नेलकरंजी भागात काँगे्रसचेच वर्चस्व

नेलकरंजी भागात काँगे्रसचेच वर्चस्व

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 7:31PMआटपाडी : वार्ताहर 

आटपाडी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नेलकरंजी ग्रामपंचायत  निवडणुकीत काँगे्रसने सत्तांतर घडवत विरोधकांना जोरदार धक्का दिला. मानेवाडी ग्रामपंचायतीतही काँगे्रसने सत्ता अबाधित राखली. या विजयामुळे नेलकरंजी परिसरात काँगे्रसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष (स्व.) मोहनराव भोसले यांच्या निधनानंतर युवा नेते जयदीप भोसले यांनी या परिसरातील गावांत सातत्याने जनसंपर्क ठेवला आहे. मागील वर्षीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयदीप भोसले यांनी खरसुंडी गटातून तुल्यबळ लढत दिली. खरसुंडी गणातील काँगे्रसच्या उमेदवाराला चांगल्या मताने निवडून आणले.

या परिसरात जयदीप भोसले समर्थक कार्यकर्त्यांचा चांगला गट आहे. नेलकरंजी ग्रामपंचायतीच्या गत निवडणुकीत काँग्रेसने जोरदार लढत देत  अकरापैकी  पाच जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला सत्तेने थोडक्यात हुलकावणी दिली होती. नेलकरंजी ग्रामपंचायतीवर युवा नेते चंद्रकांत भोसले यांच्या गटाचे वर्चस्व होते. यावेळी चंद्रकांत भोसले गट, भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना अवघ्या  चार जागा मिळाल्या. तसेच ग्रामपंचायतीवरील अनेक वर्षांची सत्ता गमवावी लागली. यामुळे या गटावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

नेलकरंजीत काँगे्रसच्या विरोधात सर्व गट, पक्ष एकवटल्याने या निवडणुकीकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र काँगे्रसचे थेट सरपंचपदाचे उमेदवार बाबासाहेब भोसले यांनी विजय मिळवला. तसेच अकरापैकी सात जागा जिंकत वीस वर्षांनी सत्तांतर घडविले.मानेवाडी ग्रामपंचायतीवर मागील काही वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. या खेपेसही काँगे्रसने थेट सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या. सरपंचपदाचे उमेदवार अमोल खरात यांनी विजय मिळवला. या विजयामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे.