Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Sangli › भाजपला पिटाळून लावा : अशोक चव्हाण

भाजपला पिटाळून लावा : अशोक चव्हाण

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 11:54PMविटा :  प्रतिनिधी 

इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा देऊन पिटाळून लावले; तसे भाजपला पिटाळून लावा,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. खानापूर घाटमाथ्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे उत्साहात स्वागत केले.  जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी केली. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, युवा नेते विशाल पाटील यांचे सुहास शिंदे यांनी स्वागत केले. पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र माने   उपस्थित होते. सुहास शिंदे यांच्या कार्यालयात या नेत्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने जनतेचा मोठा अपेक्षाभंग केला आहे. आगामी निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल. जयदीप भोसले, माणिकराव भगत, सचिन शिंदे, बेणापूरचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, राजन पवार, माजी सरपंच रायसिंग मंडले यांच्यासह मोठ्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते.