Sun, Mar 24, 2019 06:21होमपेज › Sangli › पाणी योजना पूर्ण करू : आ. विश्‍वजित कदम

पाणी योजना पूर्ण करू : आ. विश्‍वजित कदम

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 8:02PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

टेंभू, ताकारीची कामे पाठपुरावा करुन पूर्ण करू, असे  प्रतिपादन आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केले.पलूस -कडेगाव  विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने आमदार कदम यांचा शिरसगाव  येथे आभार दौरा झाला. यावेळी  ते बोलत होते. सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते. 

ते  म्हणाले, पलूस -कडेगाव मतदार संघातील ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच उमेदवारांनी  सहकार्य  केलेे ही डॉ. कदम यांच्या  तपश्चर्येचे फळ  आहे.  टेंभू-ताकारी या दोन्ही योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहे  .प्रास्ताविक प्रा. हणमंतराव मांडके यांनी केले . कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयसिंगराव कदम , शिवाजी घुटुकडे, पोपटराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले.  सरपंच सतीश मांडके, उपसरपंच शुभांगी कांबळे, रामचंद्र घुटुकडे  उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण मांडके यांनी केले .  संजय पवार यांनी आभार मानले.